जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय चलनाच्या नकली नोटा छापणाऱ्या संशयताला एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसीतील व्ही सेक्टर मधून बुधवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता छापा टाकून अटक केली होती. गुरूवारी २ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
देविदास पुंडलिक आढाव (वय-30, रा. कुसुंबा तालुका जि. जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी देविदास आढाव हा भारतीय चलनाच्या नकली नोटा तयार करून ते बाजारात वापर करत असल्याची गोपनीय माहिती विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. सूचनेप्रमाणे रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, सचिन साळुंखे यांनी कारवाई केली. एमआयडीसीच्या व्ही सेक्टरमध्ये सापळा रचून नकली नोटा वापरात बाजारात देत असल्याची खात्रीलायक सूचना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी बुधवारी १ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता संशयित आरोपी देविदास पुंडलिक आढाव (वय-३०, रा. कुसुंबा ता. जि. जळगाव) याला रंगेहात पकडून अटक केली होती. त्याच्याजवळ असलेल्या कापडी पिशवी जवळपास ४६ हजाराच्या नकली नोटा आढळून आल्या. त्याची चौकशी केली असता युट्युबवर नोटा छापण्याचे पाहून या नकली नोटा छापल्या आहे, असे त्याने सांगितले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरूवारी २ फेब्रुवारी रोजी संशयित आरोपीला बुधवार ८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोली उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.