यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नईमुद्दीन शेख यांना वोपा संस्था पुणे व जिल्हा परिषदच्या माध्यमातुन शैक्षणिक प्रकल्पात उल्लेखनिय कामगीरी बद्दल दिले जाणारे २०२२-२३ या वर्षासाठीच्या कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज बुधवार दि. २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदच्या परमपुज्य साने गुरुजी सभागृहात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील १५ विविध तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना व शाळांना व्हिस्कुल अंतर्गत डिजिटल शिक्षण पोहोचविणारे गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्याचा गौरव म्हणून कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी पुरस्कार २०२२ -२३ देऊन गौरव सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, , शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. बच्छाव, डायट जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य अनिल झोपे आदी मान्यवरांच्या उपस्थित हा गौरव सन्मान पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्ह्यातीत सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीस यावल व अमळनेर येथे कार्यरत असलेले गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचे झालेल्या भिषण अपघातात दुदैवी मृत्यु झाल्याबद्दल त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हा परिषदच्या वतीने यांना गटशिक्षणाधिकारी यांना कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी म्हणुन २०२२-२३ च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यात किशोर वायकोळे गटशिक्षणाधिकारी भुसावळ, कविता सुर्वे गटशिक्षणाधिकारी पारोळा, बळीराम धाडी, गटशिक्षणाधिकारी मुक्ताईनगर नईमुद्दीन कुतुबुद्दीन गटशिक्षणाधिकारी यावल, विलास भोई टशिक्षणाधिकारी चाळीसगाव, नरेंद्र चौधरी गटशिक्षणाधिकारी पाचोरा यांचा समावेश आहे . यावल येथील पंचायत समितीचे पुरस्कार प्राप्त गटशिणाधिकारी नईमुद्दीन शेख यांनी आपल्याला मिळालेल्या सन्मानाचे श्रेय सोबत काम करणाऱ्या सर्व शिक्षक , केन्द्र प्रमुख आणि अधिकारी यांना दिले आहे . शेख हे मागील दहा वर्षापासुन यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागात विविध पदावर कार्यरत असुन येत्या ३१ जानेवारी २०२३ रोजी त्यांचे सेवाकार्याची समाप्ती होणार आहे.