चाळीसगाव, प्रतिनिधी | गेल्या दोन दिवसांपासून शहरात दिलासादायक चित्र पहायला मिळत होते. मात्र आज अचानक चाळीसगावात तब्बल २९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहे. यामुळे चाळीसगावकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सध्या कोरोना नावाच्या शत्रूने देशात हाहाकार माजवला आहे. त्यात चाळीसगाव शहरांत गेल्या काही दिवसांपासून संत गतीने कोरोना बाधीतांची संख्या वाढतच आहे. मात्र आज जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालानुसार चाळीसगावात तब्बल २९ बाधीत रूग्ण आढळून आले आहे. यामुळे चाळीसगावकरांच्या चिंतेत वाढ होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नगरपालिका व पोलिस प्रशासनाने विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. तरीही रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.