धुळे (प्रतिनिधी) धुळ्यात राहणाऱ्या एका महिलेस राहण्यासाठी घर दाखवण्याच्या बहाणा करून धुळे तालुक्यातील शिवारात नेत दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. दरम्यान, पीडित महिला मनोरुग्ण असल्याचे कळते.
धुळ्यात राहणाऱ्या या महिलेस राहण्यासाठी घर दाखवण्याच्या बहाणा करून तिघांनी नागपूर, सुरत महामार्गापासून सुमारे दीड किलोमीटर आत शेतात नेले. तेथे दोघांनी महिलेस धमकावून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार सुरू असताना तिसऱ्याने पाळत ठेवत होता. रात्री उशिरा या महिलेस महामार्गावर सोडून तिघांनी पलायन केले. भेदरलेल्या अवस्थेत या महिलेने एक गाडी चालकाकडे मदतीची याचना केली. त्या चालकाने या महिलेस पोलिस ठाण्यात पोहोचवले. त्यानंतर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपासाची सूत्रे हाती घेऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.