धुळे : १६४ जणांना तीन वर्षे महानगर पालिका निवडणूक लढण्यास बंदी

 

Dhule Mahapalika

 

धुळे (वृत्तसंस्था) धुळे महानगरपालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे एमआयएमच्या आमदारासह १६४ उमेदवारांना पुढील तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी बंदी घातली आहे.

 

धुळे शहराचे एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा, भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांसह काही माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे. ही अपात्रता आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२० पासून लागू करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी २०२० ला हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता. त्यानुसार १६७ उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मनपा कलम १० (१ ई) अन्वये १६४ जणांवर अनर्हतेची (अपात्र ) कारवाई केली आहे.

Protected Content