धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

 

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेखाली पडून अनोळखी पुरूषाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धरणगाव रेल्वेस्टेशनजवळ घडला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक २७५/३७-३९ जवळ एका धावत्या रेल्वेतून पडल्याने अंदाजे ४५ वर्षीय पुरूषाचा जगाीच मृत्यू झाल्याचे उघडकीला आले आहे. यासंदर्भात धरणगाव स्टेशन प्रबंधक यांनी लोहमार्ग पोलीसांना कळविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून धरणगावा ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आले.

दरम्यान याप्रकरणी धरणगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक हेमंत ठाकूर करीत आहे.

Protected Content