धावत्या रेल्वेतून पडल्याने मयत झालेल्या तरूणाची ओळख पटली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आसोदा रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेतून अनोळखी तरूण गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मयताजवळील मोबार्ईलमधील सीमकार्डवरुन मयत तरुणाची ओळख पटली. राजाभैय्या लालचंद्र रावत (वय-२०, रा. राजाखेडा ता. मौरवा, जि. उन्नाव उत्तरप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुरूवार ४ मे रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

अधिक माहिती अशी की, उत्तरप्रदेशातील राजाखेडा येथील राजाभैय्या रावत हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. कामानिमित्त तो पंढरपुर येथे गेला होता. याठिकाणी हातमजूरी करुन तो आपल्या कुटुंबाला हातभारल लावित होता. बुधवारी ३ मे रोजी  सकाळी राजाभैय्या हा आपल्या गावाकडील मित्रांसोबत आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. रेल्वेत तो दरवाजावळ बसलेला असल्याने असोदा रेल्वेगेटजवळ धावत्या रेल्वेतून पडून तो गंभीर जखमी झाला होता. गंभीरअवस्थेत राजाभैय्याला तात्काळ काही तरुणांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असतांना गुरुवारी ४ मे रेाजी सकाळी ९ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. त्याजवळ असलेला मोबाईलमधील सीमकार्ड पोलीस कर्मचारी वासुदेव मराठे यांनी आपल्या मोबाईलमध्ये टाकले. त्यावर राजाभैय्या याच्या भावाचा फोन आल्यामुळे मयताची ओळख पटली. शुक्रवारी ५ मे रोजी सकाळी जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वासुदेव मराठे हे करीत आहे.

Protected Content