धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याचे तरूणाचा मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेने जोरदार धडक दिल्याने २० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रेल्वेस्थानकाजवळ घडला आहे. याप्रकरणी शनिवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप प्रभाकर कुंभार (वय-२०) रा. पाळधी खुर्द ता. धरणगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानकाजवळ १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने २० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला होता. सुरूवातील अनोळखी म्हणून पाळधी पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली होती. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पाळधी पोलीसांनी केले होते. त्या अनुषंगाने मयताची ओळख पटविण्यात आली. संदीप प्रभाकर कुंभार (वय-२०) रा. पाळधी ता.धरणगाव जि.जळगाव असे नाव निष्पन्न झाले. याप्रकरणी पाळधी पोलीसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार जयसिंग राठोड करीत आहे.

Protected Content