धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील आसोदा रेल्वे गेटजवळील नाल्याजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असे मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आसोदा रेल्वे गेटजवळील डाऊन लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४२२-२७ जवळ एका अंदाजे एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्ती हा अचानक धावत्या रेल्वे समोर आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, लोकोपायलट यांनी जळगाव स्टेशन प्रबंधक यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे, पोहेकॉ  विलास शिंदे, सुधाकर शिंदे यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. मयताची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content