जळगाव प्रतिनिधी । जळगाव ते आसोदा दरम्यान सुमारे ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा धावत्या रेल्वेखाली येवून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील जळगाव रेल्वे स्थानक ते आसोदा दरम्यान खांबा क्रमांक ४२२/२० ते २२ दरम्यान अप लाईनवर धावणार्या रेल्वेखाली येवून ४० ते ४५ वर्षीय एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. मृता रंग सावळा असून उंची ५ फुट ५ इंच आहे. तसेच त्यांच्या अंगात पांढरा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातली असून उजव्या हातावर ‘मॉं की ममता’ असे नाव गोंदलेले आहे. या घटनेची माहिती उपस्टेशन प्रबंधक व्ही. एस. कुळकर्णी यांनी दिली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.