जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावहुन जामनेर कडे जात असलेल्या धावत्या बसमध्ये महिला वाहकाने तरुणाला तिकीट घे असे सांगितले असता तरुणाने महिला वाहकाकडे वाईट उद्देशाने बघून अश्लील हातवारे करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी सोमवार 27 फेब्रुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमएच 40 एन 9094 या क्रमांकाची बस जळगावहून जामनेर कडे जात होती. या बसमधून अभय विठ्ठल गाढेकर रा. माळपिप्री, पिंप्रि ता. जामनेर हा तरुण प्रवास करत होता. बस ही जळगाव शहरातील काशिनाथ चौकात पोहोचली यादरम्यान बसमधील महिला वाहकाने अभय यास उद्देशून भाऊ तू टिकीट काढून घे असे सांगितले. यावर अभय याने महिला वाहका कडे पाहून अश्लील हात वारे करत महिला वाहक हिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटने प्रकरणी महिला वाहकाने बस थांबून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अभय गाडेकर यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहेत.