भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव नजीक महामार्गावर धावत्या ट्रकचे चाक अचानक निखळून समोरून येणाऱ्या दुचाकीला हा ट्रक धडकल्याने दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव जवळ भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या सिमेंटच्या ट्रक (एमएच १५ एफव्ही ९९९४) चे मागचे टायर अचानक निखळल्याने बादल गोकुळ पवार ( रा. साकेगाव ता.भुसावळ जि.जळगाव ) हा तरूण दुचाकीने साकेगावकडून भुसावळकडे जात असताना त्याच्या दुचाकीवर ट्रकचे चाक धडकले. या अपघातात तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरूणास तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असताना काही वेळाने त्याचे निधन झाले असे रुग्णालयातून सांगण्यात आले