अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन धर्मात तेढ निर्माण करण्याच्या प्रकरणात येथील मनोज शिंगणे याला आज सकाळी अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी एका धर्माच्या जागेवरील भिंत मनोज शिंगाणे व त्याच्या काही सहकार्यांनी तोडून दोन धर्मात वाद होतील असे कृत्य केले होते. या प्रकरणी येथील मनोज शिंगाणेवर अमळनेर पोलिसात भादंवि २९५ नुसार गुन्हा दाखल होता. तेव्हापासून तो फरार होता.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या आदेशाने त्याला अटक करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरिक्षक विकास शिरोडे, पोना योगेश महाजन, योगेश पाटील आणि नम्रता जरे यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार त्याला त्याच्या राहत्या घरातून सकाळी साडेसातच्या सुमारास अटक केली आहे.