जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालूक्यातील धानोरा शिवारातील तीन एकर शेतात नुकताच कापणी करुन काढून ठेवलेल्या मक्याला अचानक आग लागल्याने जळून नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रविवारी १४ मे रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालूका पोलिसांत अकस्मीक आगीची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील दादावाडी येथील रहिवासी दमयंती शांताराम अहिरे (वय-३८) या धानोरा(ता.जळगाव) शिवारातील शेतगट नं.१०, मधील तीन एकराची शेत जमीन करून कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवितात. नुकताच त्यांनी तीन एकर शेतात लावलेल्या मका पिकाची काढणी करुन तो शेतातच वाळत टाकला होता. शुक्रवार १२ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक मक्याच्या पिकाला आग लागली. कुणाला काही कळण्याअधीच संपुर्ण पिक जळून खाक झाले असून दमयंती अहिरे यांनी दिलेल्या खबरवरुन रविवारी १४ मे रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालूका पोलिसात अकस्मीक आगिची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करत आहेत.