Home क्राईम धानवड येथे अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ व धमकी; दोघांवर गुन्हा

धानवड येथे अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ व धमकी; दोघांवर गुन्हा

FIR

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेळेत रोखण्यात यावा यासाठी प्रशासनातर्फे अनेक उपाययोजना करत आहे. तालुक्यातील धानवड येथे कोरोना विषाणूचे सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविका महिलेस दोन जणांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील धानवड येथील अंगणवाडी सेविका योगिता पुंडलिक बोरसे (वय-३९) रा. धानवडे ता.जि.जळगाव हे कोवडी विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी गावात ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांच्यासोबत धानवड गावात २९ रोजी सर्वेक्षण करत होते. गावातील इंदीरा नगर परीसरात सकाळी ९ वाजता सर्वेक्षण करत असतांना गावातील विजय शिवदास पाटील, रविंद्र किसन पाटील हे किरणा दुकानावर बसले असतांना अंगणवाडी सेविका यांनी मास्क न लावता येथे विनाकारण का बसले असे सांगिल्याने दोघांनी अंगणवाडी सेविकेच्या हातातून सर्वेक्षणाचे रजिस्ट्रार हिसकावून जमिनीवर फेकून दिले. तू कशी काम करते तुला पाहून घेवू, तुझे घर पेटवून टाकू अशी धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अंगणवाडी सेविकेच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound