धरणगाव : १७ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज ; ५ वर्षांच्या बालिकेसह ९० वर्षीय महिलेचा समावेश

 

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कोविड सेंटर येथून आज १७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यात ५ वर्षांची वैष्णवी दत्तात्रय पाटील व ९० वर्षीय वयोवृद्ध महिला जिजाबाई तुकाराम पाटील यांनी कोरोनावर मात केली. यावेळी रुग्णांना गुलाबपुष्प, पेढा, आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या, सॅनिटायझर तसेच गुलाब पुष्प देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी स्वागत केले.

 

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी. .एम.पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, शिवसेना गटनेते विनय भावे, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, मुख्याधिकारी जनार्धन पवार तसेच माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी आदी शिवसेना नगरसेवकांसह, शिवसेना शहर प्रमुख राजेद्र महाजन, उपतालुका प्रमुख मोतीलाल पाटील, विभाग प्रमुख संजय चौधरी, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, वाल्मिक पाटिल, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी, विनोद रोकडे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे धरणगाव तालुक्यातील रुग्णाची संख्येची द्विशतकाकडे वाटचाल सुरू असतांना आतापर्यंत १३९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजच्या घडीला ५३ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहड यांनी दिली आहे. नागरिकांनी सुरक्षित घरातच राहुन, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

सेवेकरींमध्ये देव भेटला 

कोविड सेंटर येथे रोज डॉक्टर, तहसीलदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ व त्यांचे कार्यकर्ते आम्हाला रोज उत्तम जेवण, नास्ता, दूध व इतर आहार वेळोवेळी पुरवला. यामुळे मी आज जग पाहते आहे, हे मला केवळ त्याच्यातल्या माणुसकीत देव दिसला, अशी भावनिक प्रतिक्रिया कोरोनामुक्त जिजाबाई तुकाराम पाटील या महिलेने दिली.

Protected Content