धरणगाव प्रतिनिधी । वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका शिक्षिकेला दिवसाढवळ्या एका नराधमाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका केला. या घटनेच्या निषेधार्थ आज धरणगाव शहरात अनेक महिला भगिनी एकत्र आल्या व त्यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटायला लागले आहेत. या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. याचाच परिणाम म्हणून आज धरणगाव शहरात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महिला भगिनी त्यामध्ये माजी नगराध्यक्षा, नगरसेविका, प्राध्यापिका, मुख्याध्यापिका, शिक्षिका, गावातील महिला रस्त्यावर उतरल्या. छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत या घटनेच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
पो.स्टे. धरणगाव येथे काही महिलांनी मनोगत व्यक्त करतांना हिंगणघाट घटनेतील पीडित शिक्षिकेला न्याय मिळावा व आरोपीला कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, पुष्पाताई महाजन, अंजलीताई विसावे, मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, शिक्षिका प्रियंका गजरे यांनी मनोगत व्यक्त केले. तद्नंतर जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती वैशाली पवार यांच्यासह सर्व महिला भगिनींनी सपोनि देसले साहेबांना निवेदन दिले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, पुष्पाताई महाजन, अंजलीताई विसावे, नगरसेविका कीर्ती मराठे, मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, ज्योती जाधव यांच्यासह मालतीताई पवार, निनाताई पाटील, भारती पाटील, माधुरी अरक, आरती जैन, कविता पाटील, आर. यु. पाटील, जे. एस. चौधरी, व्ही. एम. बाविस्कर, कविता आहेराव, मनीषा माळी, पल्लवी मोरे, प्रियंका गजरे, शितल वानखेडे, रत्ना धनगर, ऐश्वर्या निळे, प्रीती भाटीया, ऐश्वर्या जोशी, आशा पाटील, योगिता पाटील, बेबा पाटील, विजया देशमुख, सोनल पाटील, मनिषा पाटील, ज्योती पाटील, सुनिता पाटील, वैशाली सोनार, माधुरी पाटील, अंकिता सोनवणे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.