धरणगाव प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त धरणगावात आरोग्य मार्गदर्शन व रक्तगट तपासणी शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्षा अंजलीताई विसावे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा विजय महाजन, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, भाजपा गटनेते कैलास माळी , नगरसेविका आराधना पाटील, साईसेवा लॅबचे संचालक महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी महिलांपैकी शुभांगी थोरात , ज्योती पाटील , छाया पाटील , अंकिता पाटील , प्रिया पाटील , रुपाली तांबट मनिषा चव्हाण , दामिनी अहिरे यांनी अत्यंत उत्साहाने आपले मनोगत व्यक्त केले. स्त्रीशक्तीचे महत्त्व आपल्या मराठी – हिंदी – अहिराणी गाण्यातून व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी महिलांनी व्यक्त केलेल्या विचारातून प्रमुख अतिथी मान्यवर भारावून गेले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गुलाबरावजी वाघ , कैलास माळी सर तसेच उषाताई वाघ यांनी मार्गदर्शन केले महिलांच्या रक्तगट चाचणीची तपासणी महेश पाटील यांनी केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन पौर्णिमा भाटीया यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मंगला भाटिया यांनी केले.