Home Cities धरणगाव धरणगाव येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप

धरणगाव येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप


धरणगाव प्रतिनिधी । येथील कोवीड केअर सेंटरमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांन फळवाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

येथील कोविड-१९ सेंटरमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाबाधित तसेच संशयित रुग्णांना सी व्हिटॅमिन परिपूर्ण असलेले फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्षा कल्पनाताई महाजन, गटनेते विनय भावे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, तहसीलदार नितीनकुमार देवरे, निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, किरण मराठे, भानुदास विसावे, विलास महाजन, आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश चौधरी यांच्याहस अनेक उपस्थित होते.


Protected Content

Play sound