धरणगाव येथे जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली ज्वारी, मका मोजणी केंद्राला भेट

 

धरणगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय ज्वारी मका मोजणी केंद्राला आज नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी भेट दिली त्यांनी खरेदीला येणाऱ्या अडचणी संबंधी शेतकरी संघाचे अध्यक्ष रमेश पाटील उपाध्यक्ष रमेश आंतर्देवं व शेतकरी याच्याशी चर्चा केली.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मका व ज्वारी खरेदी अधिक गतीने करण्याच्या सूचना दिल्या. व त्यासाठी खाजगी गोदाम घेण्याचे ही सूचना दिल्या. यावेळी प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार देवरे, गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे, असिष्टन रजिस्ट्रार बारी सहा पोलीस निरीक्षक देसले व्यवस्थापक अरुण पाटील व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Protected Content