धरणगाव प्रतिनिधी । ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव राज्यसभा सदनात घेऊ नये, हे माझे सदन आहे’, असे म्हणणारे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांचा निषेधार्थ धरणगाव येथे महाविकास आघाडीतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगतात खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजचे तेरावे वंशज असून त्यांनी संसदेत शपथ पुर्ण झाल्यावर जय हिंद, जय महाराष्ट्र तसेच जय शिवाजी, जय भवानी असे म्हटल्यावर, त्याला सभापतीनी विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2014 च्या शपथविधी वेळी अनेक मंत्र्यांनी घोषणा दिल्या. त्यावेळी का खासदार ना तंबी दिली नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले. तर काँग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील यांनी सभापतीनी संसदेत राजकारण करू नये, तुम्ही जरी भाजपचे संसदीय बोर्डचे पदाधिकारी असले तरी हे संसद आहे. छत्रपतीचा अपमान सहन करणार नाही असे मत व्यक्त केले, तर क्रांती सेनेचे लष्मण पाटील यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील, काँग्रेस तालुकाप्रमुख रातीलाल चौधरी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, काँग्रेसचे चंदन पाटील, शिवसेना उपजिल्हा संघटक ॲड. शरद माळी, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, युवा सेना शहरप्रमुख संतोष महाजन, काँग्रेस गौरव चव्हाण, मनोज कंखरे, विकास लबोळे, बंटी पवार, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन, जितेंद्र धनगर, अहेमद पठाण, अजय चव्हाण, माजी सभापती प्रेमराज पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, संघटक धिरेंद्र पुरभे, बुट्या पाटील, वाल्मिक पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, राजे प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष वैभव पाटील, संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष गोपाल महात्मा फुले बिग्रेडचे तालुकाध्यक्ष राजेंद्र महाजन, लक्ष्मण महाजन, काँग्रेस रामचंद्र माळी, भूषण भागवत, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी उपस्थित होते.