Home आरोग्य धरणगाव तालुक्यात २६ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह; तीन कोरोना बाधीत

धरणगाव तालुक्यात २६ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह; तीन कोरोना बाधीत

0
28

धरणगाव प्रतिनिधी । आज दुपारी आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यातील २६ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले असून तीन जण कोरोनाने बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

धरणगाव येथील कोविड केअर सेंटरवरून २९ जणांचे स्वॅब सँपल पाठविण्यात आले होते. यातील तब्बल २६ रिपोर्ट हे कोरोना निगेटीव्ह आढळून आले असून तिघांना मात्र कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात तिघांपैकी दोन रूग्ण जांभोरा तर एक पेशंट हा वराड या गावाचा असल्याची माहिती समोर आली आहे. निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्‍या परिसराला सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भागात फवारणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत असली तरी संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे.


Protected Content

Play sound