धरणगाव प्रतिनिधी । येथील कोवीड केअर सेंटरला संशयित रूग्णांचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून यात तालुक्यातून २० रूग्ण नव्याने आढळून आले आहे. अशी माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने २० रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. आढळून आलेल्या रूग्णामध्ये तालुक्यातील बोरगाव -२, धानोरा-१, पाळधी बु-४, पाळधी खुर्द-२, वराड बु-१, पोखरी-१, हिंगोणे बु-१, बिलखेडा-२ तर धरणगाव शहरातील पिल्लू मशिद-२, गुजराथी गल्ली-१, पाताळेश्वर गल्ली-१, विद्यूत नगर-२ असे एकुण तालुक्यातील २० रूग्ण आढळून आले आहे. आजचे रूग्ण पकडून ९२५ रूग्ण झाले असून यापैकी ३७ रूग्ण मयत झाले, ६४४ रूग्ण बरे झाले असून उर्वरित २४४ रूग्ण हे उपचार घेत आहे.