Home आरोग्य धरणगाव तालुक्यात आज ६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

धरणगाव तालुक्यात आज ६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !


धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ६ जणांचा कोरोनाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या ६ रुग्णांमध्ये धरणगाव शहरातील 3 तर नांदेड, पाळधी व बांभोरी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या वृत्ताला वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी दुजोरा दिला आहे.

 

धरणगाव तालुक्यात ११ जून रोजी तब्बल २२ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. एका दिवसाच्या खंडानंतर आज पुन्हा कोरोना रुग्ण सापडण्याची मालिका सुरूच आहे. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ६ रुग्णांमध्ये धरणगाव शहरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. त्यात गुजराथी गल्ली 2 व नेहरूनगर 1 रुग्ण आहे.  तर तालुक्यातील नांदेड, पाळधी व बांभोरी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात बाधितांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी असून नागरीकांची स्वत:ची काळजी घेत घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.


Protected Content

Play sound