धरणगाव तालुक्यात आज ५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज (शुक्रवार) प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहर ३ तर पिंप्री, मुसळी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.

 

धरणगाव कोवीड केअर सेंटरला आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहरातील मराठे गल्ली २, डॉ.हेडगेवार नगर १ तर पिंप्री, मुसळी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता ३२० झाली आहे. तर साधारण ९४ रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत साधारण २०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २१ जण मयत झाले आहेत. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content