धरणगाव तालुकास्तरीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक सम्पन्न

धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे तालुकास्तरीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक नितीनकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना  समन्वय ठेवण्याचे आवाहन केले.

 

आज शुक्रवार दि. १३ मे रोजी तहसिलदारनितीनकुमार देवरे यांच्या कक्षात तालुकास्तरीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्यात आली. याप्रसंगी तहसिलदार श्री. देवरे यांनी सर्व विभागांना पूर्वतयारीच्या सूचना दिल्या. यात नगरपालिका, विद्युत विभाग, आरोग्य विभाग व पंचायत समिती विभागांनी आढावा घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देणेबाबत आदेश निर्गमित केले. तसेच १ जूनपासून तहसिल कार्यालयात कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात येणार असून नागरिकांनीही दक्ष राहणेबाबत सूचना विविध विभागांनी द्याव्यात असे आदेश देण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख व प्रतिनिधी हजर होते.

Protected Content