धरणगाव, प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा ते सात महिन्यापासून रुग्ण वाहिका नसल्याबाबत ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या विशेष सहकार्याने आज एक रुग्णवाहिका धरणगावकरांच्या सेवेत सुरु केली आहे.
धरणगाव ग्रामीण रुग्णालय गेल्या सहा ते सात महिन्यापासून एकही रूग्णसेवावाहिका उपलब्ध नव्हती. याबाबत आरोग्याधिकारी डॉ. गिरिष चौधरी यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले होते की, रुग्णवाहिका १०८ नंबवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयातर्फे वारंवार मागणी करून सुद्धा मिळत नाही. परंतू याच वृत्ताची दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्याशी संपर्क साधला आणि रुग्णवाहिका कशी तत्काळ उपलब्ध करून देता येईल? याबाबत मार्गदर्शन घेतले. ना. गुलाबराव पाटील यांनी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी रुग्णवाहिकेसाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध करून दिल्या. धरणगावमधील कोणत्याही नागरिकाला कधीही रुग्णवाहिकेची आवश्यकता भासल्यास शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील शहराध्यक्ष राजू महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन निलेश चौधरी यांनी केले आहे. दरम्यान, श्री. चौधरी यांनी रुग्णवाहिका सेवेत रुजू करण्याआधी स्वतः चालवून तपासणी करून घेतली. यावेळी चर्मकार महासंघाचे नेते भानुदास विसावे, विजय महाजन हे देखील उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/895526347539978