धरणगावात शिवसेनेकडून कर्नाटक सरकारच्या पुतळ्याचे दहन !

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा धरणगाव शिवसेनातर्फे कर्नाटक सरकारचा पुतळा दहन करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मनगुटी या मराठी भाषिक असलेल्या गावातील छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक सरकारने मध्यरात्री हटवला. मराठी माणसाच्या व समस्त शिवप्रेमी असलेल्या नागरिकांच्या भावना या सरकारने दुखावल्या आहेत. याच सरकारने शालेय पाठ्यपुस्तकात असलेला महाराजांवरील धडा सुद्धा या सरकारने काढून टाकला आहे. कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून आज धरणगाव शिवसेनेतर्फे कर्नाटक सरकारचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटी,तालुका प्रमुख गजानन पाटील, पं.स.सभापती मुकुंद नन्नवरे,पं.स.माजी सभापती डी.ओ.पाटील, नगरसेवक शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक पप्पू भावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, जितेंद्र न्हाळदे, किरण मराठे, अजय चौहान, बापू पारेराव, सुरेश महाजन, विलास माळी, नंदकिशोर पाटील, धिरेंद्र पुरभे, बाळू जाधव, सतिष बोरसे, रवी जाधव, राहुल रोकडे, गारखेडाचे जिजाब पाटील, जगण महाजन, बांभोरीचे सुभाश पाटील, कमलेश बोरसे, गोलू चौधरी, किशोर मराठे, सुकलाल चौधरी, अरविंद चौधरी, तौसीफ पटेल, भैया महाजन, नागराज पाटील, गोपाळ पाटील, पवन पाटील, महेंद्र चौधरी, अविनाश चौधरी, छोटुभाऊ चौधरी, हेमंत चौधरी, विकास मोरवरकर, दारासिंग धनगर,व संत ठाकूर यांच्यासह गावातील असंख्य शिवसैनिक व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Protected Content