धरणगाव प्रतिनिधी । येथील पी.आर. हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे १ ते १५ डिसेंबर १९ दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यात प्लास्टिक हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.
या पंधरवड्यात स्वच्छते बाबत विविध उपक्रम राबविण्याचे काम सुरू आहे. यातून समाज प्रबोधन व्हावे हा देखील एक उद्देश आहे. या कार्यक्रमानुसार येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि पी. आर. हायस्कूल मधील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट यांनी आज सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. यासाठी विद्यालयातून प्लास्टिक जनजागृती रॅली काढण्यात आली.
या रॅलीचे उद्घाटन मुख्याध्यापक प्रा..बी.एन. चौधरी , उपप्राचार्य डॉ. किशोर पाटील, उपमुख्याध्यापक संजय अमृतकर,
पर्यवेक्षक डॉ. संजीव कुमार सोनवणे, यांच्याहस्ते करण्यात आले. साने पटांगणावर, कोट बाजार येथे रॅली पोहचल्यानंतर तेथे कोट बाजार आवारात असलेला प्लास्टिक चा कचरा गोळा करण्यात आला. एकत्रित केलेले प्लास्टिक पिशव्या, अन्य वस्तू यांना जाळून विल्हेवाट लावण्यात आली. सब्जी मंडईमध्ये हा उपक्रम राबविण्यात आल्याने अनेकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा संकल्प केला.
याच ठिकाणी मेजर अरुण वळवी, चीफ ऑफिसर डी एस पाटील यांनी प्लास्टिक चे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले परिसरात असलेल्या नागरिकांना , व्यवसायिकाना प्लास्टिक वापरावर निर्बंध घालण्याची आव्हाहन केले प्रत्येक नागरिकाने ,विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा ,बाजारात या पिशव्यांमध्ये वस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आणि चुकून प्लास्टिक चा वापर केलाच तर सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक फेकणार नाही. त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचा संकल्प केला तर शहरातून, राज्यातून पर्यायाने देशातून प्लास्टिक हद्दपार होईल, असेही श्री पाटील यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सत्यशील बाबर यांचे मार्गदर्शन कॅडेट सला लाभले स्वच्छता पंधरवड्यात तील विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा,कर्तव्यनिष्ठ ता आदी मूल्यांची रुजवण देखील होत आहे या उपक्रमात सिनियर,ज्युनिअर डीविजन मधील १५२ विद्यार्थी सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना प्रेरणा देण्यासाठी मुख्यद्यापाक प्रा. बी. एन. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
१८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव चे प्रतिनिधी श्री हेमा राम यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेजर अरुण वळवी, चीफ ऑफिसर डी.एस. पाटील, मिलिंद हिंगोनेकर, जितेंद्र दाभाडे, कॅडेट प्रमोद पाटील, परदेशी, ओम पाटील, प्रथमेश सोनार, कावेरी पाटील, तेजल कापडे यांनी परिश्रम घेतले.
प्लास्टिक निर्मितीवर बंदी का नाही?
विद्यार्थांची प्लास्टिक बंदी व प्लास्टिक विल्हेवाट लावण्याची मोहीम आणि समाज प्रबोधन खूप चांगले आहे मात्र प्लास्टिक बंदीची मोहीम शासन प्रभावी पने का राबवत नाही किंवा विशिष्ट मायक्रोन पेक्षा कमी मायकरोन चे प्लास्टिक निर्मितीवर शासन पूर्ण पने बंदी का घालत नाही.प्लास्टिक चे या आजारावर शासन योग्य उपचार करीत नाही ,केला तर यंत्रणा त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करीत नाही असे संतप्त प्रश्न देखील यावेळी नागरिक चर्चा करीत होते प्लास्टिक निर्मितीवर च बंदी आली तर अशा मोहीम राबविण्याची गरज पडणार नाही असे मत देखील काहींनी व्यक्त केले