धरणगाव प्रतिनिधी । शहरातील बेलदार शॉपींग कॉम्प्लेक्सच्या परीसरात चोरी करण्याच्या उद्देशाना आलेल्या ४ चोरट्यांचा पाठलाग करत असतांना सपोनि पवन देसले हे जखमी झाल्याची घटना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. यात चारही चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव पोलीस ठाण्याचे सपोनि पवन देसले आणि पो.कॉ. संदीप पाटील हे शहरात रात्री गस्त घालत असतांना मध्यरात्री १.४५ वाजेच्या सुमारास शहरातील बेलदार शॉपिंग कॉम्प्लेक्स परीसरात चोरीच्या उद्देशाने ४ संशयित चोरटे श्रीकृष्ण डेअरीजवळ दिसले. दोन्ही पोलीसांनी चौघांचा पाठलाग केले. गल्लीबोळ्यातील अंधाराचा फायदा घेत एरंडोल रोडकडे पळून गेले. चौघांचा पकडण्याचा प्रयत्नात सपोनि पवन देसले यांच्या हाताला व पायाला जखमी झाली आहे. त्यांनी धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. चोरट्यांची दुकाची क्रमांक एमएम १९ बीझेड ७५७२ ही गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००