धरणगावात कचरा डेपोला आग; अग्निशमन विभागाचे शर्तीचे प्रयत्न

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील गारखेडा रोडवरील पालिकेच्या कचरा डेपोला अचानक लागलेल्या आग लागल्याची घटना घडली होती. या आगीला विझविण्यासाठी २२ ते २३ बंब वापरूनही आग अद्याप आटोक्यात आलेली नाही.

 

याबाबत माहिती अशी की, धरणगाव नगरपालिकेचा कचरा डेपो हा गारखेडा रोडवर आहे. बुधवार ३० मार्च रोजी रात्री कचरा डेपोला अचानक आग लागली. कचरा डेपो मोठा असल्याने धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने धाव घेवून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत २२ ते २३ बंब वापनही आग अद्यापपर्यंत आटोक्यात आलेली नाही. आग  आटोक्यात आणण्यासाठी एरंडोल ६-७ तर धरणगाव १० – १५ वापरण्यात आले आहे. आगी नियंत्रण मिळविण्यासाठी निलेश वाणी, अरुण पाटील, रवीकात वाघमारे, महेश माळी, महेश चौधरी, सचिन जिने, गोपाल चौधरी तर एरंडोल पालिकेचे  किरण पाटील, प्रकाश गायकवाड हे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला होता.

 

Protected Content