Home आरोग्य धरणगावात आणखी एक रूग्ण आढळला; आज बाधित रुग्णांचा आकडा पोहचला ९ वर

धरणगावात आणखी एक रूग्ण आढळला; आज बाधित रुग्णांचा आकडा पोहचला ९ वर


धरणगाव प्रतिनिधी । धरणगावात आज सकाळी ८ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. दुपारी पुन्हा एक रूग्ण कोरोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे आज एकुण ९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली आहे.

आज नऊ रूग्ण आढळून आल्याने आता एकुण रूग्ण संख्या ४३ झाली आहे. शहरातील माळीवाडा २, अग्निहोत्री गल्ली २, वाणी गल्ली ३, संजय नगर १, जय दुर्गानगर १ असे एकुण नऊ रूग्ण आढळले आहे. एकुण ४३ पैकी ३ जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहे. दरम्यान, आढळून आलेले रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती व रहिवास असलेला परिसर यांची माहिती घेवून परिसर सील करण्याचे काम आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


Protected Content

Play sound