धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उच्च न्यायालयाकडून मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी उध्दव ठाकरे यांना परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळ शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवुन व फटाके फोडून जल्लोष केला.
गेल्या काही दिवसांपासून उध्दव ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळावा घेण्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावे यासाठी मुंबई महापालिकेकडे मागणी केली होती. दरम्यान, मैदान कुणालाही देण्यात येणार नाही अशी भूमीका मुंबई महापालिकेने घेतली होती. त्यामुळे हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने उध्दव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. न्यायालयाने दिलेल्या परवानगीच्या निर्णयाचे धरणगाव शहरातील शिवसैनिकांनी स्वागत करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर फटाके फोडून जल्लोष केला.
यावेळी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण मराठे, जितू धनगर माजी उपनगराध्यक्ष उमेश महाजन उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे अादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.