Home Cities धरणगाव धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर

धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर

0
34

धरणगाव प्रतिनिधी । येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत ऑप्टीकल्सतर्फे १० जुलै रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांचा वाढदिवस १० जुलै रोजी असून सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे ते हा दिवस साजरा करणार नाहीत. दरम्यान, त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रशांत ऑप्टीकल्सतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील प्रशांत ऑप्टीकल्समध्ये लॉकडानच्या नियमांचे पालन करून शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीत नेत्र तपासणी केली जाणार आहे. याचा नागरिकांची लाभ घेण्याचे आवाहन प्रशांत गांगुर्डे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound