धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावकरांची चिंता अजूनही पूर्णपणे मिटलेली नाही. कारण खत्री गल्ली परिसरातील रुग्णांचा अहवाल बाकी आहे. थोड्या वेळापूर्वी निगेटिव्ह आलेला अहवाल १० तारखेला पाठवलेल्या एका अन्य रुग्णाचा असल्याची माहिती समोर आली आहे.
एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे धरणगावकरांची धाकधूक मिटलेली धाकधूक अजून कायम आहे. कारण थोड्यावेळा पूर्वी जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, रावेर, धरणगाव, फैजपूर, जामनेर, चोपडा, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या 92 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले होते. यापैकी 82 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये आठ व्यक्ती भुसावळ येथील तर दोन व्यक्ती या जळगाव शहरातील आहेत. भुसावळ येथील व्यक्तीमध्ये तलाठी कॉलनी, भज्जेगल्ली, जाम मोहल्ला, लाल बिल्डींग, आयेशा कॉलनी, खडकारोड याठिकाणच्या 3 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. तर सिंधी कॉलनी, जळगाव येथील एक महिला व एका पुरुषाचा समावेश होता.