फैजपुर : प्रतिनिधी । यंदा बारावी परीक्षेत धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयातून २३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विज्ञान, कला व वाणिज्य या तीनही शाखांमधील सगळे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १०० टक्के लागला आहे .
विज्ञान शाखेतून प्रथम – सायली सुभाष पाटील ( ९०.५०%) , द्वितीय- दर्शना चंद्रकांत चौधरी (९०.१६%) तृतीय – शितल अनिल आमोदकर (८९.५०% ) प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत. वाणिज्य शाखेतून प्रथम – कुमुद किरण जैन (९२.८३% ) , द्वितीय – सायली अनिल जैन (८८.३३%) तृतीय – प्रतिक देवेंद्र ठाकुर ( ८७ % ) गुणांनीं उत्तीर्ण झाले आहेत . कला शाखेतून दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सायली भरत नेहेते (९१ % ) व पियुष यशवंत कपाटे (९१ % ) अशी त्यांची नवे आहेत कला शाखेतून द्वितीय क्रमांक सोनाली अशोक तायडे ( ७५.३३ %) व तृतीय क्रमांक धिरज संजय तायडे ( ७५.१६ % ) यांना मिळाला आहे
एम .सी व्ही.सी.विभागातून ४१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यांचा निकाल १०० % लागला प्रथम -समीर अमन तडवी (इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी , ६४ % ) , द्वितीय -श्वेता दिलीप चौधरी ( ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी , ६३.६६ %) आणि तृतीय – डिगंबर जगदीश पालक (इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी , ६३ % ) या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी , उपाध्यक्ष , सर्व संचालक मंडळ , प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी , उपप्राचार्य , कनिष्ठ महाविद्यालयाच्या इन्चार्ज प्रा. वंदना बोरोले तसेच शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे .