धनंजय मुंडे-सुप्रिया सुळेंनी स्वीकारले झुडपात टाकलेल्या बालिकेचे पालकत्व

IMG 20200225 WA0006

 

बीड (वृत्तसंस्था) परळी शहरात झुडपात टाकलेल्या नवजात बालिकेचे पालकत्व बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, तसेच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले आहे.

 

बीड जिल्ह्यातील परळी शहरातील रेल्वे रुळाजवळ असेलल्या काटेरी झुडपात स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. परिसरातील नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर चिमुकलीला तात्काळ परळीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या धनंजय मुंडे यांनी या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे. तर महाशिवरात्री महोत्सवादरम्यान हा प्रकार घडल्याने नवजात मुलीचे ‘शिवकन्या’ असे नामकरण रण्यात आले आहे.

Protected Content