धक्कादायक : स्पा सेंटरवर काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार; जिल्हापेठ पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रिंगरोडवरील स्पा सेंटरवर काम करणाऱ्या महिलेवर मालकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, हरियाणा राज्यातील २८ वर्षीय महिला ही कामाच्या निमित्ताने जळगावात वास्तव्याला आहे. दरम्यान रिंगरोडवरील सी सल्ट स्पा सेंटरवर नोव्हेंबर २०२१ पासून महिला नोकरीला आहे. दत्तू लक्ष्मण माने (रा. नाशिक) हा स्पा सेंटरचा मालक असून सेंटरमध्ये दिपक बडगुजर आणि पंकज जैन हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. २४ फेब्रुवारी रोजी सेंटरचे मालक दत्तू माने हा नाशिकहून जळगावातील सेंटरवर आला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महिला एकटी असतांना दत्तू माने याने महिलेकडून मसाज करून घेतला. त्यावेळी त्याने महिलेशी जबरदस्ती करून अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर उरलेला पगार देणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर दुकानातील मॅनेजर दिपक बडगुजर आणि पंकज जैन यांनी देखील अंगाला हात लावून विनयभंग केला. त्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकले. याप्रकरणी महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दत्तू लक्ष्मण माने रा. नाशिक, दिपक बडगुजर आणि पंकज जैन दोन्ही रा. जळगाव यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.

Protected Content