औरंगाबाद (वृत्तसंस्था) शेजाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून म्हाडा कॉलनीतील ५४ वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
या प्रकरणात मृत उषा गायकवाड यांचे पती विजयकुमार किशनराव गायकवाड यांनी तक्रार दिली. सहा जुलै रोजी नेहमीप्रमाणे गायकवाड कामाला गेले होते. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांची मुलगी नम्रता हिने आई दिसत नसल्यामुळे आजूबाजूला शोध घेतला. त्यावेळी एका खोलीचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यामुळे नम्रता खिडकीतून घरात डोकावली असता तिला आपल्या आईने ओढणीने फॅनला गळफास घेतल्याचे दिसले. गायकवाड यांनी घराचा दरवाजा तोडून उषा यांना शेजाऱ्यांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत घाटीत नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी गायकवाड यांच्या घराची झडती घेतली असता घरात आत्महत्येबाबत लिहिलेल्या मजकुराची डायरी हाती लागली. त्यात उषा यांनी लिहिले आहे की, शेजारी राहणारे प्रदीप उर्फ बालाजी रोंगे, त्याची पत्नी, गौरव रोंगे, भुजंग याची पत्नी, सौरभ भोळे, लक्ष्मण पगारे, दयानंद आरख, त्याची पत्नी, मयूर व शुभम आरख अशा दहा जणांनी आमचे कुटुंब येथे राहू नये यासाठी गायकवाड कुटुंबाला शिवीगाळ करून धमक्या देत आहे. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. यावरून पोलिसांनी उषा विजय गायकवाड (वय ५४, रा. म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप परिसर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर प्रदीप भाऊराव रोंगे (वय ४८), गौरव प्रदीप रोंगे (वय २०), लक्ष्मण मल्हारी पगारे (वय ७३, सर्व रा. बाबा पेट्रोलपंप, म्हाडा कॉलनी), दयानंद हरिभाऊ आराख (वय ५३), शुभम दायानंद आराख (वय २४) व मयूर दयानंद आराख (वय १९, सर्व रा. एन-४, परिजातनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.