सातारा (वृत्तसंस्था) एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणाला धमकी देऊन विवाहितेने अत्याचार केल्याप्रकरणी एका विवाहितेविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुण साताऱ्यात आपल्या मावशीकडे गावच्या यात्रेसाठी आला होता. आरोपी महिलेला पिडीत तरुणाचा नकळत धक्का लागला. मात्र महिलेने घरी आल्यावर पीडिताने मुद्दाम धक्का मारल्याचा आरोप केला. त्यानंतर ‘तू केलेल्या गैरवर्तनाविषयी मी तुझ्या भावाला सांगेन’ अशी धमकी देत संशयित आरोपी महिलेने स्वत:शी शरीरसंबंध ठेवण्यास आपल्याला भाग पाडले. तसेच काही दिवसानंतर पुन्हा संशयित आरोपी महिलेने पीडित मुलाला संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तर याबाबत शरीरसंबंध झाल्यानंतर त्याची वाच्यता न करण्याची धमकी दिली. अखेर पिडीत तरुणाने घडलेला सर्व प्रकार आपल्या मावशीला सांगितला. यानंतर पोलिसात संशयित आरोपी महिलेविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.