धक्कादायक : पब्जी खेळतांना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू !

नांदेड (वृत्तसंस्था) मोबाईलवर पब्जी गेम खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात मच्छिंद्र पार्डी गावात घडली आहे.

 

नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी गावात राजेश नंदू राठोड हा तरुण आपल्या मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. गेम सुरु असतानाच राजेशला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांनतर त्याने राजेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पब्जी खेळाच्या नादात अनेक तरुणांचे मानसिक संतुलन हरवले तर काहींनी आत्महत्या देखील केल्या आहेत.

Protected Content