पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका गावात राहणारी महिलेला दुचाकीवर बसवून जंगलात नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिच्या गावातील ओळखीचा लखन जगन पवार याने २५ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दुचाकीवर बसवून जंगलात घेवून गेला. तिथे तिचे तोंड दाबून जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी लखन जगन पवार याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.