धक्कादायक : चोरीच्या आरोपाखाली दोन दलित तरुणांच्या गुप्तांगात पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर टाकले

marhan tayar

 

जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानमधील नागौरमध्ये चोरीच्या आरोपाखाली दोन दलित तरुणांना अमानूष मारहाण करून त्यांच्या गुप्तांगात पेट्रोल आणि स्क्रूड्रायव्हर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातीली पांचौडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार घडला आहे. येथील करणू सर्विस सेंटरमध्ये चोरी केल्याचा आरोप दोन तरुणांवर ठेवण्यात आला. त्यानंतर या सर्विस सेंटरमधील कर्मचाऱ्यांना या तरुणांना मारहाण केली. तसेच त्याचा व्हिडीओ देखील बनविला. सोशल मीडियावर या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघं तरुण स्वत:च्या बचावासाठी गयावया करत आहेत. तसेच मारहाण करणाऱ्यांची माफी मागत आहेत. मात्र आरोपींकडून कुठलीही दयामाया न दाखवता त्यांना मारहाण करण्यात येत आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये 7 जणांचा समावेश असून, यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content