धक्कादायक : चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करतांना रंगेहात पकडले; नागरीकांनी दिला चोप

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्याला रंगेहात पकडले आहे. संतप्त नागरिकांना चांगला चोप दिल्याची घटना समोर आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणारी २ वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घराशेजारी राहणारा सुभाष महादू महाजन हा दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत अंगावरील कपडे काढून अश्लिल चाळे करत होता. दरम्यान, चिमुकलीची आई शोधाशोध करत सुभाष महाजन याच्या घरात घसुल्यावर हा प्रकार पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. हा प्रकार नागरीकांना समजल्यावर संतप्त नागरीकांनी संशयिताला पकडून चांगला चोप दिला. पिडीत चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुभाष महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे

Protected Content