धक्कादायक : घरात काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील एका भागात घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेच्या घरात घुसून एकाने जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी १९ ऑक्टोबर नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ४८ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. धुणेभांडीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. १३ नोव्हेंबर रेाजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महिला ही लक्ष्मीनगर भागात परिसरातील एका ठिकाणी धुणंभांडी करण्याचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. घरात साफसाफाईचे काम करत असतांना जामनेर तालुक्यातील पहुर येथील प्रकाश पुंडलिक पाटील याने महिलेशी अंगलट करत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या मुलाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली, या संदर्भात शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रकाश पुंडलिक पाटील यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

Protected Content