धक्कादायक : गतिमंद मुलीवर नात्यातीलच व्यक्तीने केला अत्याचार

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यात एका गतिमंद मुलीवर नात्यातीलच व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली असून मुक्ताईनगर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच जलद गतीने चक्र फिरवत दोन तासात आरोपीस अटक केली आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावामध्ये गतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवार दि. ९ जुलै रोजी दुपारी दोन वाजता गतिमंद मुलीचे आई वडील शेतात गेल्याची संधी साधत आरोपी गजानन संजय खिरोळकर याने त्या मुलीला शेजारच्या घरात नेत जबरदस्तीने अत्याचार करून पोबारा केला होता. मुलीचे आई वडील शेतातून घरी आल्यानंतर मुलीने मुलीने इशारा करून सर्व हकीकत सांगितली. हे ऐकताच आई वडिलांना धक्काच बसला. काय करावे ? कुठे जावे ? याबाबत पूर्ण कुटुंब चिंतेत पडले. आरोपी हा नात्यातीलच असून नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. अखेर पोलीस स्टेशन गाठत रात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री गुन्हा दाखल होताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर. पी. बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून जलद गतीने तपास चक्र फिरवून रात्री साडेतीन वाजता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी गजानन संजय खिरोळकर विरुद्ध भादवी कलम 376, 376 (2)( एल ),376 ( 2)( जे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. पी. बोरकर करत आहे.

 

Protected Content