Home आरोग्य धक्कादायक : कोरोना बाधीताचा लग्नात संचार; धरणगावचे पाच जण क्वारंटाईन

धक्कादायक : कोरोना बाधीताचा लग्नात संचार; धरणगावचे पाच जण क्वारंटाईन

0
33

धरणगाव प्रतिनिधी । चोपडा येथे अलीकडेच झालेल्या विवाहात सहभागी झालेला एक व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विवाहात सहभागी झालेल्या धरणगावातील पाच जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील कोट बाजार परिसरात वास्तव्यास असणारे एक कुटुंब हे चोपडा येथील एका तरूणाच्या विवाहात सहभागी झाले होते. या विवाहत सहभागी झालेला एक व्यक्ती हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आज निष्पन्न झाले. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या या पाचही जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून उद्या त्यांचे स्वॅब सँपल घेण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिली आहे. निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी याला दुजोरा दिला आहे.


Protected Content

Play sound