धक्कादायक : कोरोना बाधिताचा पुणे-फलटण तब्बल आठ वेळा प्रवास

 

पुणे (वृत्तसंस्था) महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या ओळखपत्राचा वापर करुन १ मार्च ते २७ एप्रिलदरम्यान पुणे ते फलटण आणि फलटण ते पुणे असा तब्बल आठ वेळा प्रवास केला असून हा कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

संबंधित कर्मचारी (वय २८) हा महावितरणच्या पुण्यातील अग्निशामक दल उपविभागामध्ये काम करीत आहे. तो मुळचा फलटण तालुक्यातील मिरेवाडी या गावचा रहिवासी आहे. पुण्यात असतानाच त्याला सर्दी-खोकला आणि ताप असा त्रास जाणवू लागला होता. पुण्यातील रुग्णालयात तपासणी करुन घेण्याऐवजी त्याने फलटणपर्यंत दुचाकीवरुन तब्बल आठ वेळा प्रवास केला होता. एवढेच नव्हे तर मिरेवाडी, पुणे-पिंपरी-चिंचवड येथे देखील प्रवास केला आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या तब्बल २२ जणांचा ‘हाय रिस्क’ गटात समावेश करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे त्याच्या काही सहकाऱ्यांनाही लागण झाल्याचे निष्पन्न समोर आले आहे.

Protected Content