धक्कादायक : कोरोनाच्या भीतीने पुण्यात रिक्षाचालकाची आत्महत्या !

पुणे (वृत्तसंस्था) कोरोनाच्या भीतीने सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील एका रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

अनिल बाबुराव खाटपे (वय: ५४, रा. बडदे चाळ , गारमाळ, धायरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास एका पुरुषाचे प्रेत लगड मळ्याच्या पाठीमागील कॅनॉल लगतच्या एका झुडुपात अडकले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कॅनॉलबाहेर प्रेत काढल्यानंतर खिश्यात सुसाईड नोट व ड्रायव्हिंग लायसन्स आढळून आले. सुसाईड नोटमध्ये मला कोरोना आजार होईल व त्याच्या त्रासाने हाल होऊन मरण्यापेक्षा मी स्वत:च आत्महत्या करून मरतो, अशा आशयाचा मजकूर लिहिलेला आहे.

Protected Content