धक्कादायक : केरळ विमान अपघातात बचाव कार्य करणाऱ्या २२ जणांना कोरोनाची लागण

केरळ (वृत्तसंस्था) केरळच्या कोझिकोडमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेदरम्यान बचाव कार्य करणाऱ्या २२ जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

 

गेल्या आठवड्यात केरळच्या वंदे भारत मिशनअंतर्गत दुबईहून येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाची अपघात झाला. हे विमान कोरोनामुळे दुबईत अडकलेल्या लोकांना भारतात परत आणत होते. या दुर्घटनेत वाचवण्यात आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याचे नंतर समोर आले होते. त्यामुळे या प्रवाशांना बाहेर काढणाऱ्या सीआयएसएफच्या ३० अधिकाऱ्यांना शनिवारी १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. कोरोनाबाधित २२ जणांमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी आणि जिल्ह्याच्या आयुक्तांचाही समावेश आहे. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते.

Protected Content